जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव साजरा

बाणेर : बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण, सुस आणि महाळुंगे परिसरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव २०२५ जय्यत तयारीनिशी आणि प्रचंड उत्साहात पार पडला.  जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने भव्यदिव्य पद्धतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे विशेष उपस्थित होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत  जगताप यांनी जयेश मुरकुटे यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा करून वातावरणाला राजकीय रंगही दिला.

उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून लोकप्रिय अभिनेत्री सई मांजरेकर आणि ‘बिग बॉस’ फेम जान्हवी किल्लेकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी समस्त मुरकुटे परिवार तसेच औंध, बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी परिसरातील ग्रामस्थ व सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी केलेल्या रोमांचक खेळांनी उपस्थितांना भारावून टाकले. पुण्यातील गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.

हा दहीहंडी उत्सव केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा न ठरता सामाजिक एकात्मतेचा आणि राजकीय संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा ठरला.

See also  पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात 125 कोटी रुपयांचा गैरव्यवहार आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत दिली माहिती