पाषाण पासून थेट येरवड्यापर्यंत तीन क्षेत्रिय कार्यालयातील परिसराचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक 7

पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणुकी संदर्भामध्ये प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या रचनेमध्ये प्रभाग क्रमांक ७ गोखले नगर वाकडेवाडी तयार करत असताना प्रशासनाने काय विचार केला असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाषाण पासून सुरू होऊन थेट येरवड्यापर्यंत प्रभाग रचना निमुळती तयार करण्यात आली आहे.

मुळात प्रत्येक प्रभागासाठी एकच नगरसेवक असणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या राजकीय सोयीसाठी चार नगरसेवकांचा एकच प्रभाग असा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. राजकीय समीकरणे साधण्यासाठी प्रभागांची भौगोलिक रचना मुद्दाम विस्कळीत करण्यात आली आहे. असा आरोप आम आदमी पार्टी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केला आहे.

प्रभाग क्रमांक 7 – जो पश्चिम पुण्यातून पाषाण गावातून सुरू होऊन थेट पूर्वेकडील येरवडा येथे संपतो. एवढेच नव्हे तर, एका प्रभागातील नागरिकांना कामांसाठी तीन वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांत जावे लागणार आहे.

तर सुस बाणेर बालेवाडी प्रभाग ९ मध्ये जवळपास सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे मतदार संख्या ही एक लाखाहून अधिक असणार आहे.

याशिवाय समाविष्ट 32 गावांसाठी ही रचना धोक्याची घंटा ठरणार असून, त्यांच्या मूलभूत प्रकल्पांचे काम आणखी कित्येक वर्षे रखडण्याची शक्यता काय राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

See also  विजय डाकले यांनी केला नऊ रिक्षा चालकांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ, त्यांना "रिक्षा" हे चिन्ह मिळाले आहे