राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी सुनील माने यांची फेरनिवड

पुणे  : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी सुनील माने यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

यापूर्वीही त्यांनी प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्ता म्हणून काम केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता आ.जितेंद्र आव्हाड यांनी सुनील माने यांची फेरनिवड केली आहे. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी ही निवड घोषित केली आहे.

See also  शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर