चेक बाउन्स प्रकरणी बांधकाम व्यवसायिकाला सहा महिने कारावास व दुप्पट रक्कम अदा करण्याची शिक्षा; औंध येथील ज्येष्ठ नागरिकाला मिळाला न्याय

औंध : औंध परिसरातील ज्येष्ठ नागरिकाला चेक बाउन्स प्रकरणी नऊ वर्षानंतर न्यायालयाने निकाल देत चेक बाउन्स करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला सहा महिने कारावास व रकमेच्या ड्रॉफ्ट चा परतावा देण्याचे आदेश दिले आहेत.

औंध येथील रहिवासी कन्हैयालाल राजानी व त्यांची मयत पत्नी भारती राजानी यांनी चाकण येथील एका व्यावसायिक प्रकल्पामध्ये दुकान विकत घेण्यासाठी 27 लाख रुपये बांधकाम व्यावसायिक गणेश नारायण सांडभोर यांना दिले होते. परंतु आरोपी गणेश नारायण सांडभोर यांचा प्रकल्प पूर्ण झाला नाही त्यामुळे त्यांनी दिलेले रक्कम परत देण्यासाठी चेक सन 2016 मध्ये अदा केले होते. परंतु हे चेक वटले गेले नव्हते. वारंवार मागणी करून देखील रक्कम मिळत नसल्याने कन्हैयालाल राजानी यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.

सदर केस मध्ये सर्व पुरावे सादर केल्यानंतर मेहेरबान न्यायालयाने आरोपी गणेश सांडभोर यांना चेकच्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्यात यावी तसेच सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. सदर न्याय प्रक्रियेमध्ये फिर्यादी कन्हैयालाल राजानी यांच्या वतीने ॲड. एन.डी. गवारे यांनी काम पाहिले.

See also  गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस