कोथरूड शिवसेना डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन

कोथरूड : कोथरूड शिवसेना डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोथरूड येथे मोफत आरोग्य शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात  मोफत औषधाचे व मोफत चष्म्याचे वाटप, मोफत ECG, मोफत नेत्र तपासणी, महिलांची कॅन्सर तपासणी शिबिरात निदान झालेल्या सर्व नागरिकांची पूर्णतः मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत अँजिओप्लास्टी – बायपास शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या हस्ते  महा आरोग्याचं शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. व‌ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक कुटुंबकल्याण व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विडीओ कॉल द्वारे शिबीराच्या दोन्ही संयोजकांना शुभेच्छा दिल्या. किरण मारणे व उदय भेलके यांच्या नेतृत्वात या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विश्वजीत श्रीरंग बारणे ( पश्चिम महाराष्ट्र सचिव युवा सेना),किरण साळी ( सचिव महाराष्ट्र राज्य युवा सेना),कल्पनाताई थोरवे ( पुणे महानगर महिला प्रमुख)
राजेश पळसकर ( पुणे महानगर युवासेना प्रमुख) श्रद्धा शिंदे ( शिवसेना पुणे शहर प्रमुख), नितीन पवार ( पुणे शहर उपप्रमुख)
या महाआरोग्य शिबिराचा शेकडो  लोकांनी लाभ घेतला आहे.
तसेच या वेळेस.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज  ढाकवे,यांनी केले होते.

यावेळी शिवसेनेचे रोहित मारणे, मीनल घनवट, प्रीती मारणे, मंगल सोनटक्के, ज्योती वाल्लेकर, ॲड स्वप्निल अवधूत, प्रमोद बाराते, लक्ष्मीकांत गोणेकर, शैलेश वाडेकर, तोफिक शेख, प्रणय मेहता, सागर पोरे, अजय सपकाळ, सागर अवधूत, आनंद भिलारे, योगेश खोपडे, अनिराज कुराडे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक व महिला  उपस्थित होते.

See also  पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकुलतेसाठी आग्रही -मुरलीधर मोहोळ