पुणे : श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी न्यासाच्या ॲड.पांडुरंग ज्योतिबा थोरवे यांच्या मंदिर न्यास निधीतून पुणे महानगरपालिका संचलित बचपन बचाव समिती अंतर्गत घरट प्रकल्प या अनाथ मुलींच्या आश्रमाला नवरात्रीचे औचित्य साधून 55 इंची टीव्ही संच भेट देण्यात आला.
यावेळी मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त ॲड.पांडुरंग थोरवे यांच्या मंदिरास निधीच्या वतीने टीव्ही संच भेट व वह्या,दप्तरे भेट देण्यात आली. यावेळी श्री मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, प्रा.वर्षा थोरवे प्रकल्पाच्या संचालिका स्मिता वाघ, शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.
या संस्थेमध्ये 50 अनाथ मुली निवासी शिक्षण घेत आहेत. या टीव्ही संचामुळे बातम्या किंवा youtube याद्वारे बाहेरच्या जगाशी या मुली सदैव संपर्कात राहतील व त्यांच्या ज्ञान व गुणवत्तेत निश्चितपणे भर पडून सकारात्मक बदल होतील असे मत ॲड.थोरवे यांनी व्यक्त केले. यानिमित्ताने प्रा वर्षा थोरवे यांनी नवरात्रीनिमित्त मुलींना शुभेच्छा देत त्यांचे औक्षण व पूजन करत देव संस्थांच्या वतीने अनोख्या प्रकारे कन्या पूजन करत खऱ्या अर्थाने नवरात्रीची सुरुवात केली.
मंदिर न्यासाचा निधी हा खऱ्या अर्थाने वंचितांपर्यंत पोहोचणे व त्याचं सत्कार्याला उपयोग व्हावा हे विश्वस्तांचे प्रमुख कार्य आहे . त्यामुळे मंदिर न्यासाच्या वतीने जास्तीत जास्त अनाथ दिव्यांग या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसाठी श्री मार्तंड देव संस्थान समर्पित भावनेने कार्य करेल असा विश्वास विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केला. दोन्ही विश्वस्तांच्या वतीने गेल्या वर्षी मुलींसाठी जेवणाचे टेबल भेट देण्यात आले होते आणि यंदा दूर टीव्ही संच देवून खऱ्या अर्थाने वंचितांची सेवा करीत समाजात आदर्श मार्तंड देव संस्थान प्रस्थापित करत आहेत मार्तंड देवस्थान मंदिर न्यास आहे जे शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करत आहे.
नवरात्रीनिमित्त त्यांच्या वतीने आलेल्या या अनोख्या भेटीमुळे संस्था उपकृत झालेले आहे असे मत संचालिका स्मिता वाघ यांनी व्यक्त केले. 55 इंच टीव्ही संच तसेच वह्या दप्तर मिळाल्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद देवीच्या प्रसन्न मुद्रेसारखा झाला होता.येळकोट येळकोट जय मल्हार व आई जगदंबा उदो उदो हा उद्गोष मुलींनी केला.