पाषाण : पाषाण सुस रोड येथील VJ Indilife ही व्यावसायिक स्टुडिओ सदनिका आहे. या ठिकाणी येणारे ग्राहक हे सामाजिक जाणवेचे भान न ठेवता रात्री अपरात्री मध्यधुंद अवस्थेमध्ये आरडाओरडा करत असतात. तसेच अर्वाच्य भाषेमध्ये अश्लील असे वर्तन करत असतात. मोठ्या प्रमाणावर ध्वनी क्षेपकाचा वापर करतात. यामुळे आजूबाजूला रहिवाशी इमारती आहेत त्या ठिकाणी जेष्ठ नागरिक, मुले, महिला यांना या सर्व गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच सदर व्यवसायिक इमारत ही बाणेर टेकडीच्या एकदम जवळ आहे बाणेर टेकडीवरती जैवविविधता वाढवण्यासाठी वसुंधरा अभियान व इतर नागरिकांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे गेल्या काही वर्षात या ठिकाणी वन्यप्राणी विविध पशुपक्षी यांचे प्रमाण वाढत आहे. पण या व्यावसायिक इमारती मध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अनैसर्गिक कृत्य होत असते. त्यामुळे निसर्गाला व येथील जैवविविधतेच्या असलेल्या गोष्टींना हानी पोहोचविण्याचे काम प्राथमिक दृष्ट्या जाणवत आहे. तरी या गोष्टीचाही विचार करून या ठिकाणी रात्री अपरात्री होणाऱ्या अनैसर्गिक कृत्यांना पायबंद घालावा. यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सुतार यांनी केली आहे.