पुणे- ओकायमा मैत्रीस 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे महापालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर मॅडम यांनी पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड येथील पुणे ओकायामा मैत्री उद्यानास भेट दिली.
यावेळी कोजी याकी (कॉन्सलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई) व या संस्थेचे प्रतिनिधी तसेच अशोक घोरपडे सह महापालिका आयुक्त, माधव जगताप (उपायुक्त), जयंत भोसेकर (उपायुक्त), आशा राऊत (उपायुक्त), प्रज्ञा पोद्दार, (सहाय्यक महापालिका आयुक्त) व उद्यान विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कलाग्राम येथे “कोणीचीवा” २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन मा. महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले.
























