नगररोड क्षत्रिय कार्यालयाची अनधिकृत केबलवर कारवाई

नगररोड : नगररोड वॉर्ड ऑफिस अंतर्गत खराडी चौक ते गुंजन चौक येथे विद्युत खांबावरील , झाडांवरील, रस्त्यालगत भितींवरील लटकणाऱ्या अनाधिकृत केबल्स वर कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ,मुख्य अभियंता(विद्युत विभाग)श्रीनिवास कंदुल यांचे आदेशानुसार महापालिका सहायक आयुक्त नामदेव बजबळकर यांचे मार्गदर्शनानुसार उपअभियंता श्री.मुकुंद लंगरकांडे व कनिष्ठ अभियंता श्री.मंगेश मिसाळ यांचे नियंत्रणाखाली,पुणे शहर येथे जुन 2023 मधे होणाऱ्या G-20 परिषदेच्या अनुषंगाने शहर विद्रुपीकरण निवारण व शहर सौंदरिकरण च्या निमित्ताने कारवाई करण्यात आली.

कारवाई दरम्यान एकूण अंदाजे 10 km लांबीच्या केबल्स वर नगर रोड वॉर्ड ऑफिस कडून कारवाई करणेत आली. अनाधिकृत केबलवर कारवाई नियमितपणे करण्यात येणार असल्याचे यावेळी सहायक आयुक्त नामदेव बजबळकर यांनी सांगितले.

See also  श्री गजानन मंडळ आणि श्री गरूड गणपती मंडळ या लक्ष्मी रस्त्यावरील दोन मंडळांची सलग ९ व्या वर्षी एकत्र श्री गणेश विसर्जन मिरवणूक."लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांचा मोठा सामाजिक उपक्रम"