बालदिन व वाढदिवसानिमित्त कोथरूडमधल्या ५५० बाल मित्रांना शैक्षणिक साहित्य वाटप

कोथरूड : शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष व युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष राज गोविंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड येथील ५५० बाल मित्रांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यामध्ये वह्या, स्केल, शार्पनर, रबर, पेंसिल, पेन सेट आदी साहित्य होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कविता , पाढे सादर केले. 

यावेळी शुभम मोकाटे, अथर्व गाढवे, निहाल शेख, प्रतिक बंडी, सार्थक मोकाटे, हिमांशु इंगोले, मयुर भालिया, अथर्व कुलकर्णी, गणेश मांडके, लोकेश गोपाळे, प्रथम परिट, मोहित डोमाले, मयुर रापत्ती, रमेश सातपुते, पियुष घाटे, शुभम कुलकर्णी, विशु मोहोळ, भैया घांडगे, अथर्व तावरे, विनय बंडी, गोपाल गोलांडे, विकास आवळे, विश्वास खवळे, योगेश भगत, साहिल दळवी आदी उपस्थित होते.

See also  झोपडपट्टी विरहीत शहर करण्याचे शासनाचे प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार