उद्या आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या कामाची सुस येथे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी; प्रभागातील प्रमुख इच्छुक उमेदवार अनुपस्थित

सुस : सुस नांदे रस्त्यावरील सनी वर्ल्ड येथील रस्त्याचे रुंदीकरण व रस्त्याचा चढ कमी करण्याच्या कामाचे उद्घाटन शनिवारी 22/11/2025 रोजी भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले आहे. परंतु या छोट्याशा कामाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी अचानक केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे प्रभाग नऊ मधील प्रमुख इच्छुक उमेदवार यावेळी प्रभागांमध्ये पक्षाचे प्रमुख तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाहणी असताना देखील अनुपस्थित राहिले. यामुळे उद्या उद्घाटन ठरलेल्या रस्त्याची अजित पवार यांनी अचानक पाहणी केली व यावेळी प्रभाग क्रमांक नऊ मधील प्रमुख इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, पुनम विधाते, रोहिणी चिमटे हे अनुपस्थित राहिले. विशेष बाब म्हणजे यावेळी मतदार संघामध्ये पालकमंत्री अजित पवार यांची पाहणी असताना आमदार शंकर मांडेकर देखील अनुपस्थित होते.

यामुळे हा पाहणी दौरा अचानक ठरला असावा की स्थानिक राजकीय श्रेयाच्या हेतूने हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

See also  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक यांना जयंती दिनी अभिवादन