हजारो नागरिकांच्या समस्या सोडवणारी अमोल बालवडकर यांची “क्यूआरटी” टीम

बाणेर : अमोल बालवडकर क्यूआरटी टीमच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या अडचणींवर त्वरित प्रतिसाद देणे हे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले ही क्यूआरटी टीम हजारो नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरली आहे.

आजपर्यंत अनेक समस्यांचा त्वरीत तोडगा काढण्यात क्यूआरटी टीम यशस्वी ठरली आहे; मग तो रस्त्यावरील अडथळा असो, पाणीपुरवठा किंवा विजेची तातडीची समस्या, चेंबर साफसफाई किंवा चेंबर बदलणे, आवश्यक कामांसाठी जेसीबी यंत्रणा उपलब्ध करणे, रस्त्यालगत वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापणे, बंद पडलेले पथदिवे त्वरीत सुरु करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व रस्ता दुरुस्ती करणे, ग्राउंड लेव्हलला जाऊन प्रत्यक्ष नागरिकांना मदत पोहोचविणे, प्रशासकीय कामांमध्ये अडथळा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन पाठपुरावा करत नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे, मुळा नदी व राम नदीला पूर आल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर उभे राहणे, अतीवृष्टीमुळे पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी योगदान देणे असो किंवा इतर कोणतीही अडचण असो.. अशा सर्वच अडचणींसाठी अमोल बालवडकर क्यूआरटी टीमकडून तात्काळ सेवा पुरविण्यात येते.

प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे लक्ष देणे, त्वरित उपाययोजना करणे आणि परिसरातील नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळवून देणे हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. अमोल बालवडकर QRT टीमची ही तत्परता हेच दाखवते की, शब्दांपेक्षा काम महत्वाचं आहे. प्रभागांमधील शेकडो सोसायटीमध्ये नागरिकांनी क्यूआरटी टीमच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवून घेतल्या आहेत. समस्या असलेल्या भागांमध्ये क्युआरटीची गाडी उभी असल्यानंतर नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना देखील निर्माण होते. समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून निर्माण झालेली हक्काची टीम आजही अनेक सोसायटींना तसेच समस्याग्रस्त नागरिकांना दिलासा देणारी ठरत आहे.

See also  महाविद्यालयाची व्हर्टिकल वाढ करण्याचा मानस आहे : संस्थेचे कार्यवाह मा डाॅ गजानन र. एकबोटे