बाणेर : बाणेर बालेवाडी च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 24 वर्षीय तरुण नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी निवडणूक रिंगणात उतरत आहे. 85 वर्षाच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असलेल्या शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून गेले चार वर्ष नागरिकांमध्ये सातत्याने कार्यरत असलेला जयेश संजय नाना मुरकुटे सध्या बाणेर बालेवाडी पाषाण सुस महाळुंगे परिसरातील युवक व नागरिकांमध्ये प्रभावशाली नेतृत्व म्हणून समोर येत आहे.
भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुस बाणेर पाषाण प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून सातत्याने काम करत जयेश मुरकुटे याने महाविकास आघाडीचे आव्हान उभे केले आहे.
नागरिकांशी साधलेला विनम्र संवाद, शांत राहून उत्तर देण्याची प्रभावशाली शैली, सुशिक्षित उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून 24 वर्षीय जयेश मुरकुटे सध्या सोसायटी वर्गासह स्थानिक युवकांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.
भाजपाच्या बालेकिल्लात आव्हान तयार करण्यासाठी महाविकास आघाडीची एक मूठ तयार झाली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांची स्थानिक पातळीवर आघाडी करत झालेल्या बैठकीमुळे महाविकास आघाडीची प्रभाग नऊ मधील स्थिती अधिक भक्कम मानली जात आहे. याचा फायदा महाविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांना होणार असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुण वर्गासाठी जयेश मुरकुटे सध्या रोल मॉडेल ठरताना दिसत असून अभ्यासपूर्ण समस्या मांडण्याची शैली त्या अनुषंगाने उपायांची मांडणी यामुळे अभ्यासू सुशिक्षित तरुण सध्याच्या दूषित झालेल्या राजकारणात येऊ पहात आहेत असा आशावाद जयेशच्या माध्यमातून सध्या बाणेर बालेवाडी च्या राजकारणात अनुभवायला मिळत आहे.
प्रशासनाकडून करून घेतलेल्या रस्त्यांची दुरुस्ती कामे, ड्रेनेज लाईन, स्वच्छता यासंबंधीची कामे युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, मॅरेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे या माध्यमातून जयेश मुरकुटे याने आपल्या कामाची शैली व प्रभाव नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे. यामुळे भाजपा समोर प्रभावशाली विरोधकाची भूमिका सध्या बाणेर बालेवाडी पाषाण च्या राजकीय रिंगणात पाहायला मिळत आहे.
समाजाभिमुख काम करणारी तरुण कार्यकर्त्यांची फळी राजकीय रिंगणात सध्या उतरताना दिसत आहे या युवकांच्या पाठीशी समाज राहणार का ही बाब पाहणे सध्या औत्सुक्याचे ठरणार आहे.























