जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा मुळशी येथे संपन्न: प्रथम क्रमांक मोरया कबड्डी संघ लवळे, द्वितीय क्रमांक भैरवनाथ संस्था संघ भोसरीने पटकाविला

लवळे -पुणे जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने, आयोजक कु.ओम प्रशांत गावडे व आदर्श दिलीप आल्हाट तसेच मोरया कबड्डी संघ लवळे यांच्या वतीने मुळशी तालुक्यात प्रथमच जिल्हास्तिरीय ६५ किलो भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन लवळे (ता.मुळशी) येथे करण्यात आले होते.

कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला.या कार्यक्रमाला आमदार शंकरभाऊ मांडेकर,अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव साहेब,मा.जिल्हा परिषद सदस्य, शांतारामदादा इंगवले,मा.सभापती, महादेवअण्णा कोंढरे,राहूलदादा पवळे, दगडूकाका करंजावणे, रमेशअण्णा पवळे, रामदासभाऊ गोळे, जिल्हा उपाध्यक्ष, सचिनभाऊ अमराळे,प्रशांत रानवडे,आबासाहेब शेळके, बाबासाहेब कंधारे,नंदूशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ही आमच्यासाठी विशेष सन्मानाची बाब ठरली.

अर्जुन पुरस्कार विजेते जाधव साहेबांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून खेळाचे महत्व, युवकांमध्ये शिस्त,संघभावना आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यातील क्रीडा संस्कृतीची भूमिका प्रभावीपणे मांडली.मोठ्या संख्येने उपस्थित असलेले क्रीडाप्रेमी नागरिक, संघांचे प्रतिनिधी आणि युवा खेळाडू यांच्यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत जिल्ह्यातून ६४ संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मोरया कबड्डी संघ लवळे, द्वितीय क्रमांक भैरवनाथ संस्था संघ भोसरी, तृतीय क्रमांक राकेश भाऊ घुले संघ बोपखेल, चतुर्थ क्रमांक बालाजी प्रतिष्ठान संघ कोथरूड यांनी पटकावला.

या कार्यक्रमाला पुणे जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, तालुक्यातील नेते, कार्यकर्ते,व मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांचे सहकार्य लाभले. खेळ,समाज आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.असे आयोजक   कु.ओम प्रशांत गावडे व कु.आदर्श दिलीप आल्हाट यांनी बोलून दाखवले.

See also  बालेवाडी हायस्ट्रीट ग्राउंडवर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे 600 स्क्वेअर फुट एलईडी स्क्रीनवर अमोल बालवडकर यांच्या वतीने क्रिकेट चाहत्यांसाठी लाईव्ह प्रक्षेपण