खडकवासलाः महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा प्रभाग असलेल्या खडकवासला, शिवणे, धायरी या गावांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 33 सह 34 आणि 35 मधून आज भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा या पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अपक्ष अर्ज दाखल करण्यामध्ये करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत नाराज कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
बंडखोरीची लागण होऊ नये म्हणून सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करण्यास उशीर लावला आहे. काल सर्व पक्षांमध्ये बैठकांचे सत्र दिवसभर चालू होते. या बैठकांमधून येणाऱ्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. सायंकाळी पाच नंतर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. यादीत नाव असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केले.
प्रभाग क्रमांक 33 मधून धनश्री दत्तात्रय कोल्हे, ममता सचिन दांगट, सुभाष नाणेकर, आणि किशोर पोकळे यांनी भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून अनिता तुकाराम इंगळे आणि काका उर्फ सोपान चव्हाण, अमोल दांगट यांनी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संदीप मते यांनी अर्ज दाखल केले. भाजपाचे निष्ठावंत नाराज उमेदवार किरण गुलाबराव हगवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
वडगाव धायरी या प्रभाग क्रमांक 34 मधून राजाभाऊ लायगुडे, हरिभाऊ चरवड, जयश्री भूमकर, कोमल सारंग नवले यांनी तर सन सिटी माणिक या प्रभाग क्रमांक 35 मधून सचिन मोरे, श्रीकांत जगताप, मंजुषा नागपुरे ज्योती गोसावी भाजपमधून अर्ज दाखल केले.























