“पक्षाची पूर्ण ताकद जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी” – वंदनाताई चव्हाण जयेश मुरकुटे यांच्या प्रचारार्थ परिवर्तन स्नेह मेळावा

बाणेर : बाणेर येथील माऊली गार्डन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाच्या वतीने आयोजित परिवर्तन स्नेह मेळावा माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

या मेळाव्याला बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार व कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सभास्थळी परिवर्तनाचा निर्धार आणि उत्साह स्पष्टपणे जाणवत होता.

यावेळी उपस्थित नागरिकांनी तरुण, सुशिक्षित आणि प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराला निवडून देत परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
पक्षाची पूर्ण ताकद जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी” – वंदनाताई चव्हाण
मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी खासदार वंदनाताई चव्हाण म्हणाल्या,“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाची संपूर्ण ताकद जयेश मुरकुटे यांच्या पाठीशी आहे. प्रश्नांची जाण असलेला, सुशिक्षित आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे. पाषाण, सुस, महाळुंगे, बाणेर आणि बालेवाडीची सुज्ञ जनता जयेशच्या पाठीशी निश्चितपणे उभी राहील आणि विजय निश्चित आहे.”

या वेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, अशोक मुरकुटे, अनिकेत मुरकुटे, सिद्धार्थ रणवरे, जनार्दन मुरकुटे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
परिवर्तन स्नेह मेळाव्यामुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून जयेश मुरकुटे यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

See also  विकासक आणि वास्तुविशारदांनी ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात - पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे