सुस : प्रभाग क्रमांक -९ , सुस बाणेर येथील तीर्थ आरोहि सोसायटीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हाच्या उमेदवार ज्योती नितीन चांदेरे यांना संपूर्ण सोसायटी धारकांचा जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी नितीन चांदेरे, ज्योती नितीन चांदेरे, स्वाती सूर्यवंशी, धनवंती जाधव, सुनीता ताई रानवडे, सुनील राजगुरू, सोसायटीचे चेअरमन तसेच मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.
सुसगाव परिसरातील नागरिक व विविध सोसायट्यांकडून ज्योती चांदेरे यांना वाढता जाहीर पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच अनुषंगाने प्रचारादरम्यान ज्योती चांदेरे, नितीन चांदेरे व स्वाती सूर्यवंशी यांनी सोसायटीतील नागरिकांशी थेट संवाद साधला.
या संवादात नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक व मूलभूत नागरी सुविधांबाबत प्रश्न मांडले. या सर्व प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले. स्थानिक प्रश्नांची जाण, थेट संवाद आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये ज्योती चांदेरे यांची उमेदवारी अधिक बळकट होत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


























