पुणे : अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, पुणे शहर तर्फे भव्य किल्ले स्पर्धा २०२५ बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला
अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, पुणे शहर यांच्या वतीने आयोजित भव्य किल्ले स्पर्धा २०२५ चा बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात व उत्सवमूर्ती वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, मैत्री युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले, उद्योजक विशाल पवार, रोहन पायगुडे, संघटनेचे पुणे शहर सरचिटणीस गणेश मापारी, तसेच पुणे शहर युवक अध्यक्ष युवराज दिसले उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व पुस्तक भेट देण्यात आली.या स्पर्धेत एकूण १२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा व्यक्तिगत व गट अशा दोन विभागांत घेण्यात आली होती.
या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले की, “किल्ले बनविणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव जपण्याचे कार्य आहे. तरुण पिढीने हे कार्य पुढे चालवले पाहिजे.” तसेच येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन पुणे शहर युवक अध्यक्ष युवराज दिसले यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सुनिल पवार यांनी केले, राकेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर अतिष शेडगे यांनी आभार प्रदर्शन केले.
























