‘महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षां’च्या नेत्यांसह महाराष्ट्र राज्याच्या ‘मुख्य निवडणूक अधिकाऱ्यां’ची भेट घेत निवेदन दिले

मुंबई : मुंबई येथे ‘महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षां’च्या नेत्यांसह महाराष्ट्र राज्याच्या ‘मुख्य निवडणूक अधिकाऱ्यां’ची भेट घेतली. आगामी निवडणुकांपूर्वीची मतदार नोंदणी व मतदार यादीतील घोळ, दुबार नोंदणीची प्रकरणं, व्हीव्हीपॅटचा अभाव, सत्ताधाऱ्यांना पूरक ठरणारी व मतदारांना अन् विकासाला मारक ठरणारी प्रभाग पद्धती अशा अनेक बाबींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि, ह्याच मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी लिखित स्वरूपात निवेदन सुपूर्द करून ‘मुख्य निवडणूक अधिकाऱ्यां’समवेत प्रदीर्घ चर्चा केली.

पण स्वायत्त ‘निवडणूक आयोगा’सारख्या संविधानिक संस्थांबद्दल, त्यांच्या कारभाराबद्दल संबंध देशात शंका का घेतली जात आहे ह्याबाबत आयोगाने आत्मपरीक्षण करून योग्य ते बदल करणं व संविधानिक मूल्य जपणं ही अपेक्षा सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केली.

ह्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष  राज ठाकरे, ‘काँग्रेस’चे ज्येष्ठ नेते श्री. बाळासाहेब थोरात, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार श्री. शशिकांत शिंदे, विधीमंडळ पक्षनेते व आमदार श्री. जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ‘मुंबई काँग्रेस’ अध्यक्षा व खासदार वर्षाताई गायकवाड, ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाचे खासदार श्री. अनिल देसाई, आमदार ऍड. अनिल परब, आमदार आदित्य ठाकरे, ‘समाजवादी पार्टी’चे आमदार श्री. रईस शेख, ‘शेतकरी कामगार पक्षा’चे सरचिटणीस व माजी आमदार श्री. जयंत पाटील व कॉ. प्रकाश रेड्डी यांच्यासह इतरही लोकप्रतिनिधी व मान्यवर नेते उपस्थित होते.

See also  सांगवीत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा करणे पोलीस कर्मचाऱ्यांना पडले महागात