महाळुंगे गावात ज्योती नितीन चांदेरे यांची पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाळुंगे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्योती नितीन चांदेरे यांनी महाळुंगे गाव परिसरात भव्य पदयात्रा काढून प्रचार केला. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

पदयात्रेदरम्यान महाळुंगे गावातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, नागरी सुविधा, शिक्षण व आरोग्य अशा विविध विकासात्मक मुद्द्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची दखल घेत गाठीभेटी घेतल्या गेल्या.

या पदयात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार जीवन चाकणकर, संदीप बालवडकर यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करत महाविकास आघाडीच्या एकजुटीचा संदेश दिला.

महाळुंगे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी ज्योती नितीन चांदेरे यांनी सांगत, नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

See also  जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम संपन्न