“विचारांसाठी लढा महत्त्वाचा” – बाणेरमध्ये हर्षवर्धन सपकाळांचा कार्यकर्त्यांना संदेश; जीवन चाकणकर यांची घेतली भेट

बाणेर : प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जीवन चाकणकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी बाणेर परिसरात भेट घेतली. या भेटीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल अधिक बळकट झाले आहे.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी, “तुम्ही केवळ निवडणूक लढवत नाही, तर पक्षाच्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी लढत आहात. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

प्रदेशाध्यक्षांच्या या भेटीनंतर प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार आणखी पक्का झाल्याची भावना उमेदवार जीवन चाकणकर यांनी व्यक्त केली.
“जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरायचा प्रामाणिक प्रयत्न अखंड सुरू राहील,” असेही त्यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी व पाषाण परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या भेटीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

See also  सुतारवाडी येथील श्री काळभैरवनाथ उत्सव उत्साहात साजरा