पूनम विधाते–प्रमोद निम्हण यांच्या प्रचाराला बाणेर–बालेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद ; विकासकामांच्या मुद्द्यावर आक्रमक प्रचार

बाणेर : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये अपक्ष उमेदवार पूनम विशाल विधाते व प्रमोद निम्हण यांनी बाणेर–बालेवाडी परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार केला.

यावेळी अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण यांनी पाषाण परिसरात त्यांनी यापूर्वी केलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली. रस्ते, पायाभूत सुविधा, नागरी समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा त्यांनी यावेळी मांडला.

तर पूनम विधाते यांनी वामा संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाशी संबंधित विकासकामे व विविध उपक्रमांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. समाजोपयोगी उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रचारादरम्यान बाणेर–बालेवाडी परिसरातील सोसायट्यांमधून अपक्ष उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी आपल्या परिसरातील अपूर्ण राहिलेली विकासकामे, पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता आदी दैनंदिन समस्यांबाबत प्रश्न मांडले.या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर भर देणारा हा प्रचार नागरिकांच्या पसंतीस उतरतानाचे चित्र या दौऱ्यात पाहायला मिळाले.

See also  कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक ; शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासन