पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळावा काँग्रेस पक्षाची मागणी

पुणे : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व पुणे महानगरपालिका मधील अंतर्गत कंत्राटी कामगार यांना दिवाळी बोनस मिळावे यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले साहेब यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कंत्राटी कामगारांना अनेक वर्ष पासून बोनस बंद करण्यात आला कंत्राटी कामगार दिवसभर कष्ट करत असतो त्याची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्याला दिवाळी बोनस मिळावा अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी  कंत्राटी कामगार मजदूर काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष किशोर मारणे,  कंत्राटी कामगार मजदूर काँग्रेस कोथरूड अध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, आकाश देवकुळे, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.

See also  पंढरपूर येथील धर्म शाळेसाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेरच्या वतीने तीन लाख रुपयांची मदत