सांगवी : श्री शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त सिंहगड किल्ल्यावरून शिव-ज्योत आणण्यात आली. या सोहळ्यात बालगोपाळांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विजयराव पलांडे, बापु यादव,सचिन दादा थोरवे, प्रकाश दादा गोगावल,महेश भोसले अभिषेक निकम यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून मा.अतुल शितोळे (नगरसेवक) मा.हर्षल ढोरे (नगरसेवक) सौ.शारदाताई सोनवणे (नगरसेविका) यांनी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांना त्यांच्या शौर्यगाथेचा पुनःस्मरण झाला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. ‘छावा’ चित्रपटातील काही प्रसंगांचे जिवंत सादरीकरण ठरले, जोशपूर्ण “पोवाडे”. या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले. तसेच, शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य आणि अभिनयाने उपस्थितांचे मन जिंकले.
शिवाजी महाराज रांगोळी स्पर्धा – बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने रांगोळीच्या माध्यमातून शिवरायांचे भव्य चित्र रेखाटले. रेखाचित्र व चित्रकला स्पर्धा – मुलांनी विविध रंगांमध्ये शिवाजी महाराजांचे पराक्रम चित्रबद्ध केले. ‘छावा’ चित्रपटातील काही प्रसंगांचे जिवंत सादरीकरण – लहान मुलांनी ऐतिहासिक प्रसंग नाट्यरूपात सादर करून उपस्थितांना शिवकालीन इतिहासाची अनुभूती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्या वतीने सहभागी बालगोपाळांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला स्थानीय नागरिक, शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. उपस्थित नागरिकांनी हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने अनुभवला आणि शिवाजी महाराजांच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी सौ.मनिषा चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीक आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सचिन थोरवे, प्रकाश गोगावल, महेश भोसले, गणेश यादव,प्रशांत कामटे, सागर बाविस्कर,विशाल बहिरट,मंदार काकडे, विशाल कारखानीस,अभिषेक निकम,आदेश मदने,आदेश तारळकर,सौरभ गोसावी,श्रीकांत भोईटे,अभय पाचकवडे,आकाश बिरादार, विकास बिरादार,प्रविण आणि शिवप्रेमींनी विशेष मेहनत घेतली.
घर ताज्या बातम्या श्री शिवाजी तरुण मंडळ शितोळे नगर,जुनी सांगवी मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात...