महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल देवव्रत यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

मुंबई: महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत राज्यपालांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. दिवंगत अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो”, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी तसेच लोकभवन येथील पोलीस जवान व अधिकारी देखील उपस्थित होते.

See also  योगीराज पतसंस्थेच्या वतीने इस्त्रो मध्ये निवड झालेल्या अजय भुजबळ यांचा सन्मान