योगीराज पतसंस्थेच्या कृष्णानगर शाखेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पिंपरी : योगीराज पतसंस्थेच्या कृष्णानगर शाखेचा 26 वा वर्धापन दिन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक विकास साने, निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड, तुषार हिंगे, यश साने, राहुलदादा जाधव, नगरसेविका सुलभा उबाळे, संगीता ताम्हाणे, सोनम मोरे, योगिता नागरगोजे, रिटा सानप यांचा नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

तसेच 10 वी च्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या 10 गरीब विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच नैना मेश्राम या गरीब मुलीच्या लग्नासाठी संस्थेच्या वतीने “योगीराज कन्यारत्न विवाह मदत योजने” अंतर्गत संपूर्ण भांड्यांचा संसार देऊन कन्यादान करण्यात आले. संस्थेच्या सभासदांना 70 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले व वर्धापनदिनानिमित्त संस्थेचे सभासद रामदास विधाते यांनी 10 लाख रुपये ठेवीचा धनादेश दिला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगती व सामाजिक कार्याचा लेखाजोखा यावेळी मांडला. संस्थेने यापूर्वी 210 गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली आहे. 140 गरीब मुलींच्या लग्नात संपूर्ण भांड्यांचा संसार देऊन कन्यादान करण्यात आले आहे. मागील वर्षी संस्थेला 3 कोटी 84 लाख रुपयांचा निव्वळ नफा संस्थेला झाला होता तो यावर्षी 5 कोटी रुपयांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संस्थेने आर्थिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल केंदीय सहकार विकास महामंडळाने राज्यातील “आदर्श पतसंस्था” म्हणून गौरव केला आहे, असेही तापकीर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

याप्रसंगी भंडारा डोंगर समिती अध्यक्ष तथा संस्थेचे सहयोगी संचालक बाळासाहेब काशिद, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अशोकराव मुरकुटे, सचिन सानप, निलेश बोराटे, रामदास विधाते, प्रल्हाद मुरकुटे, संग्राम मुरकुटे, संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालक संजय बालवडकर, गणेश तापकीर, सहयोगी संचालिका निकिता माताडे, शाखा समिती सदस्य प्रदीप नेवाळे, पंढरीनाथ गायकवाड, पांडुरंग कदम, योगेश म्हेत्रे, रामदास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे, सर्व स्टाफ, परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे नागरिक, विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच खातेदार उपस्थित होते.

See also  बाणेर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथ मराठा समाजाचा जल्लोष; मनोज जरंगे पाटील यांच्या भगिनी देखील सहभागी

आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे शाखाध्यक्ष शंकरराव सायकर यांनी केले तर उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी आभार मानले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली.