बाणेर : रोहन लेहर ३, बाणेर येथे यंदाची शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहात व पारंपरिक व प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आली.
उत्सवाची सुरुवात बालेवाडी स्टेडियम येथून शिवज्योत प्रज्वलित करून रोहन लेहर ३ सोसायटीपर्यंत आणण्यात आली. या शिवज्योतीने संपूर्ण परिसर शिवमय झाला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. देवीदास फड साहेब (बावधन पोलिस स्टेशन) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची आरती संपन्न झाली. आणि त्यांनी रहिवाशांचे आभार मानून मार्गदर्शन केले.
संध्याकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सोसायटीतील चिमुकल्यांनी शिवरायांवरील पोवाडा, शिवभक्तीपर नृत्य आणि लघुनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या अभिनयातून शिवचरित्र जिवंत झाले.
शिवचरित्र व्याख्याते समीर दिवेकर यांनी प्रभावी शिवव्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य आजच्या बालक- तरुणांसाठी त्यांचे आदर्श, गनिमी काव्याची रणनीती आणि मोडी लिपीचे महत्त्व यावर प्रकाश टाकत प्रबोधन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रोहन लेहर ३ मधील रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन नियोजन, आयोजन व सहभाग घेतला. समाजभावना, एकजूट आणि शिवप्रेम यांचे सुंदर दर्शन या उत्सवातून घडले.























