भारती विद्यापीठ जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन पुण्याच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय यश

पुणे : इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस् असोसिएशन (IEDSSA) ने आयोजित राज्यस्तरीय आंतर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत भारती विद्यापीठ जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन पुणे (जे.एन.आय.ओ. टी.) च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय स्थान मिळवून संस्थेचा गौरव वाढवला. या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपली क्रीडा चतुराई आणि मेहनत सिद्ध केली. स्पर्धा नुकतीच संजीवनी पॉलिटेक्निक, कोपरगाव येथे संपन्न झाली असून, जे.एन.आय.ओ. टी. च्या विद्यार्थ्यांच्या संघाने पहिल्यांदा सहभागी होताना चि. अभिराज सकपाळ, चि. आयुष पार्टे यांच्या अप्रतिम कामगिरीमुले अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि उपविजेतेपद पटकावले. उपविजेत्या संघामध्ये  चि. सक्षम काळे, चि. वेदांत वाईकर, चि.वरद रणखांबे यांचा समावेश होता. त्यांना प्रा. अनुप राऊत यांनी मार्गदर्शन केले.

या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावास, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनास आणि संस्थेच्या क्रीडा विभागाच्या सहकार्याला जाते. विद्यार्थ्यांनी संघर्षातून शिकण्याची आणि विजयाची प्रेरणा दिली आहे.

संस्थेचे प्राचार्य श्री. ऋषीकेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, “हे यश विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या धोरणाचे फलित आहे असे नमूद केले. उप प्राचार्य श्री. अमितराव पाटील, क्रीडा विभाग प्रमुख श्री. पी. पी. शिंदे व सौ. अनिता मुथा यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या भविष्यातील यशासाठी शुभकामना दिल्या. जे.एन.आय.ओ.टी. पुणे हे अभियांत्रिकी शिक्षणासह क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. या यशामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचा मान वाढला आहे.

See also  जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने बालेवाडी पोलीस चौकी येथे प्रिंटर भेट