बाणेर : बालेवाडी-बाणेर पाषाण रहिवासी संघटनेच्या (बीबीपीआरए) सदस्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळ येथे भेट घेऊन हिंजवडी येथे जाणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना, विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्या विधान भवन, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बीबीपीआरएच्या कोअर कमिटीचे सदस्य सारंग वाबळे, अमेय जगताप, प्रणवजीत माने यांनी बाणेर-बालेवाडी परिसराचे प्रतिनिधित्व करत मांडल्या.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते.या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमसी आणि पीसीएमसी आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, एनएचएआय आणि मेट्रो प्रतिनिधींसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
राधा चौक अंडरपास:
राधा चौकातील अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने वाहतूक कोंडी होते. शिवाय, हा चौक दोन पोलिस अधिकारक्षेत्रांत येतो – पुणे पोलिस आणि पीसीएमसी – ज्यामुळे गर्दीच्या वेळी समन्वयाचा अभाव असतो.
प्रलंबित एनएचएआय अंडरपास:
राधा चौक आणि भुजबळ चौक (बालेवाडीला जोडणारा) दरम्यान एनएचएआयने दीर्घकाळ प्रलंबित असलेला अंडरपास प्रकल्प हाती घेतला, कारण यामुळे गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.
बालेवाडी-जगताप डेअरी पूल:
बालेवाडी ते जगताप डेअरी मार्गे कस्पटे वस्तीला जोडणारा बहुप्रतिक्षित पूल हा प्रवाशांची वाहतूक सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. सुरू करण्यासाठी रस्त्याच्या जागा ताब्यात घेण्याबाबत प्रक्रिया वेगाने करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की बालेवाडी-जगताप डेअरी पुलासाठी रस्त्याचे काम आणि भूसंपादन प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाईल. तसेच रस्त्यांची कामे सुरू होतील.
तसेच एनएचएआयला अंडरपासचे काम जलद करण्याचे आणि खड्डे टाळण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी टिकाऊ सिमेंटचा वापर करून सेवा रस्ते बांधण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंजवडी आयटी पार्क जवळील परिसरात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, टाऊन प्लॅनिंग राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद यांच्या एकत्रित प्रयत्नातून समस्या सुटणे गरजेचे आहे ही बाब यावेळी बीबीपीआरए च्या शिष्टमंडळाने मांडली. यावेळी एक नोडल ऑफिसर देऊन रस्त्यांची तसेच परिसरातील समस्यांची कामे सोडवण्यात येतील असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
घर ताज्या बातम्या बाणेर बालेवाडी व राजीव गांधी आयटी पार्क मधील नागरिकांच्या समस्या बीबीपीआरएच्या कोअर...