रिपब्लिकन पक्ष शहराध्यक्षपदी शैलेश चव्हाण

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर कार्यकर्त्यांच्या सर्वसाधारण बैठकीत पुणे शहराध्यक्ष पदी शैलेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मित्रपक्ष  भारतीय जनता पार्टी यांचे आभार मानण्याचाही ठराव यावेळी संमत करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी दिवंगत रिपब्लिकन जगन्नाथ गायकवाड नेते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचा अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे यांची महानगरपालिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल तसेच निलेश आल्हाट यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आसित गांगुर्डे, महाराष्ट्र प्रदेश सदस्य अशोक शिरोळे, अशोक कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबुराव घाडगे, महेंद्र कांबळे, अल्पसंख्यांक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफिक दफेदार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भगवान गायकवाड, तसेच कोअर कमिटी सदस्य वसंत बनसोडे, महादेव दंडी, महादेव कांबळे, सुगत धसाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश सदस्य अशोक कांबळे यांनी ठरावाचे वाचन केले. बैठकीचे सूत्रसंचालन अशोक शिरोळे यांनी केले, आभार प्रदर्शन  सरचिटणीस महादेव कांबळे यांनी केले.

See also  पुणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा राज्यालाही दिशादर्शक ठरेल असा निर्माण करा- प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील