पुणे : व्यवसायिक गॅस सिलेंडरची टंचाई झाल्याने शहराच्या मध्यवस्तीतील जुन्या खानावळी, हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर्स बंद पडू लागली असून, त्यावर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगारही बुडत आहे.शंभर वर्षे जुन्या न्यू पूना बोर्डिंगमध्ये चूल, शेगडी आणि इलेक्ट्रिक कढई यांचा वापर करून स्वयंपाक तयार केला जात आहे. पोळी, भाकरी हे पदार्थ देणे खानावळी चालकांना अशक्य झाले आहे, जेवणात पापड, भजी, वगैरे तळण देणे अनेक खानावळी, हॉटेल्समधून बंद झाले आहे. टिळक रोडवरील एक जुनी खानावळ, फडके हौदाजवळील मिसळचे हॉटेल गेल्या आठवड्यापासून बंदच आहे. रॉकेल वरील स्टोव्हचा वापर करून चहा विक्री केली जाते. ते प्रमाणही अल्प आहे.
शंभर वर्षे जुन्या न्यू पूना बोर्डिंगमध्ये चूल, शेगडी आणि इलेक्ट्रिक कढई यांचा वापर करून स्वयंपाक तयार केला जात आहे. पोळी, भाकरी हे पदार्थ देणे खानावळी चालकांना अशक्य झाले आहे, जेवणात पापड, भजी, वगैरे तळण देणे अनेक खानावळी, हॉटेल्समधून बंद झाले आहे. टिळक रोडवरील एक जुनी खानावळ, फडके हौदाजवळील मिसळचे हॉटेल गेल्या आठवड्यापासून बंदच आहे. रॉकेल वरील स्टोव्हचा वापर करून चहा विक्री केली जाते. ते प्रमाणही अल्प आहे.काही हॉटेल्सनी ब्लॅकने सिलेंडर आणल्याची चर्चा होत आहे. प्रत्यक्षात त्याची शहानिशा होऊ शकलेली नाही. व्यवसायिक गॅस सिलेंडरवरील निर्बंध २३ मार्चपासून २०टक्के उठवले जातील, असे केंद्र सरकारने जाहीर केले प्रत्यक्षात अद्याप हे निर्बंध उठवलेले नाहीत.
काही हॉटेल्सनी ब्लॅकने सिलेंडर आणल्याची चर्चा होत आहे. प्रत्यक्षात त्याची शहानिशा होऊ शकलेली नाही. व्यवसायिक गॅस सिलेंडरवरील निर्बंध २३ मार्चपासून २०टक्के उठवले जातील, असे केंद्र सरकारने जाहीर केले प्रत्यक्षात अद्याप हे निर्बंध उठवलेले नाहीत.
हॉटेल इंडस्ट्रीवर परिणाम झाल्याने मध्य वस्तीतील गर्दी कमी झाली आहे. छोटी हॉटेल्स, स्नॅक सेंटर ५० टक्के बंद आहेत. येथील कामगारांना दोन वेळचे जेवण आणि सहाशे रुपयांपर्यंत रोजगार मिळायचा. तो बंद झाला आहे.
हॉटेल्समधील कामगार , विद्यार्थी यांचे स्थलांतर वाढत चालले आहे. गांवाकडे जेवणाची सोय तरी होईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले .
























