भोंदूबाबा वरील कारवाई बाबत, गृहमंत्री व नाशिक पोलिसांचे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने अभिनंदन

पुणे : नाशिक येथे अनेक महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी शिताफीने अटक केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि नाशिकचे पोलीस आयुक्त Sandeep Karnik यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
संघटनेच्या बैठकीत या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष Rajendra Kapote होते.

यावेळी बोलताना राजेंद्र कपोते यांनी सांगितले की, भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाई केली. त्यामुळे आरोपीला परदेशात पळून जाण्याची संधी मिळाली नाही. नाशिक पोलीस दलाची ही कामगिरी अत्यंत प्रशंसनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, अशोक खरात याच्यासारखे अनेक भोंदूबाबा समाजात सक्रिय असून, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही कपोते यांनी यावेळी केली.

पुण्यातील पोलीस मित्र संघटनेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता ही या सरकारने दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी काढून ठेवलेली - संजय राऊत