पुणे : औंध गावठाण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गुरुद्वारा ते मलिंग चौक दरम्यान नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ औंध येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी नगरसेविका भक्ती गायकवाड यांच्या प्रयत्नातून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेण्यात आला आहे.
औंध परिसरात मोठ्या प्रमाणात नव्या इमारती उभारल्या गेल्यामुळे जुन्या ड्रेनेज व्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे जुन्या लाईनऐवजी अधिक क्षमतेची नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सपना छाजेड, प्रकाश क्षीरसागर, दगडू रानवडे, गणेश गायकवाड, अभिजीत सुभाषदादा गायकवाड,दिलीप अण्णा गायकवाड, रत्नाकर तात्या गायकवाड, दौलत गायकवाड, विष्णू रानवडे, सुरेश रानवडे, गणेश रानवडे, राजू सोनवणे आणि विलास रानवडे, राहुल गायकवाड, सुनिल गायकवाड, निलेश गायकवाड, अजित सुभाषदादा गायकवाड, विजय गायकवाड, प्रसाद गायकवाड, गणेश प्रकाश गायकवाड, राहुल वाव्हळ, रमेश सुभेदार, जॉनभाई, मल्होत्रा, सुमित रानवडे, मोनेश रानवडे, सचिन रानवडे, अशोक तोडकर, सुभाष मुरकुटे, शिरीष नाईकरे, संदीप पाटील, अभिजीत जगताप, हर्षवर्धन गायकवाड, महादेव साळवे, सागर गायकवाड, राहुल प्रकाश गायकवाड, अजित काशिनाथ गायकवाड, स्वामी नवले आदी उपस्थित होते.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्यासोबतच दर्जेदार काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या कामामुळे परिसरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

















