सुतारवाडी रोड पुनर्विकासासाठी पाहणी; नव्या नियोजनाला सुरुवात

पुणे : सुतारवाडी रोडच्या पुनर्विकासासाठी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीत स्थानिक नगरसेविका मयुरी राहुल कोकाटे यांनी पुढाकार घेतला.

नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी यापूर्वीच माननीय आयुक्तांकडे सुतारवाडी रोडच्या दुरवस्थेबाबत मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी पथ विभागाला आवश्यक निर्देश दिल्यानंतर ही पाहणी पार पडली.

सुतारवाडी रोड विविध अंडरग्राउंड लाईन्स टाकण्यासाठी वारंवार खोदण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी खचलेला आहे. तसेच जमिनीखाली काळी माती आणि पाषाण तलावातील पाणी पाझरत असल्याने रस्ता वारंवार खचण्याची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका मयुरी कोकाटे, पुणे मनपाचे अधिकारी आणि कन्सल्टंट यांच्या उपस्थितीत रस्त्याची सविस्तर पाहणी करून नव्याने व टिकाऊ पद्धतीने सुतारवाडी रोड विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले.

यावेळी पथ विभागाचे उपअभियंता अशोक वाघमारे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील, तसेच मनपा कन्सल्टंट विकास पाटील आणि विराज कोकाटे उपस्थित होते. स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला सुतारवाडी रोड लवकरच नव्या स्वरूपात विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  संत तुकाराम नगर मधील ७५ टक्के मतदान अण्णा बनसोडे यांना होणार योगेश बहल यांचा विश्वास