पुणे : पुणे सिंहगड रोड डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. राजश्री काकडे यांची तर सचिव पदी डॉ. योगिनी पिसे यांची निवड करण्यात आली आहे.असोसिएशनच्या या वर्षाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी अपोलो हॉस्पिटलच्या सहयोगाने डॉ. नीतू मांडके सभागृहात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे प्रमुख पाहुणे म्हणून तर सन्मामनीय अतिथी डॉ हर्षद नलभिमवार उपस्थित होते.असोसिएशनच्यानवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ. जीवन आटोळे यांची निवड झाली आहे. खजिनदार म्हणून डॉ. श्रीकांत शिताळे यांच्याकडे आर्थिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संयुक्त सचिव व क्रीडा सचिव म्हणून डॉ. किरण भालेराव यांची निवड झाली असून, संयुक्त सचिव म्हणून डॉ. विवेक काळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. राकेश निकम, डॉ. अरविंद सरसंबी, डॉ.मयुरा धाट आणि डॉ. शिवराज राजोळे, डॉ. राहिला तांबोळी आणि डॉ. स्वरूप पटाईत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, माजी अध्यक्ष म्हणून डॉ. शेखर येडगे काम बघणार आहेत.
नवीन कार्यकारिणीकडून संघटनेच्या बळकटीकरणासोबतच वैद्यकीय सेवा, सामाजिक उपक्रम आणि सदस्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.














