वसूबारसनिमित्त गरूड गणपती मंदिरासमोर देशी गायींचे दर्शन; नागरिकांची गर्दी; राजस्थानी कांकरेज गाय आणि पांढऱ्याशुभ्र पंगनूर गायी ठरल्या आकर्षणाचे केंद्र

पुणे : नारायण पेठेतील गरूड गणपती मंदिरासमोर वसूबारस सणानिमित्त गरूड गणपती मंडळाच्या वतीने देशी गायींच्या पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजस्थानमधील काळ्या रंगाची कांकरेज देशी गाय, तिचे चपळ आणि गोंडस वासरू तसेच दोन फूट उंचीच्या पांढऱ्याशुभ्र पंगनूर (पन्नूर) गायी दर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या.या देशी गायी गरूड गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मयूर कडू यांच्या गोशाळेतील आहेत. वैशिष्ट्यपूर्ण रंग, उंची आणि आकर्षक रूपामुळे या गायी नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या. वसूबारसनिमित्त गायींचे पूजन आणि दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.

या देशी गायी गरूड गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष मयूर कडू यांच्या गोशाळेतील आहेत. वैशिष्ट्यपूर्ण रंग, उंची आणि आकर्षक रूपामुळे या गायी नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या. वसूबारसनिमित्त गायींचे पूजन आणि दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.

भारतीय संस्कृतीत गायीला असलेले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता वसूबारसच्या निमित्ताने देशी गायींचे दर्शन घेण्याची संधी नागरिकांना मिळाली. या उपक्रमामुळे देशी गोवंशाच्या विविध जातींची माहिती आणि त्यांच्याविषयीची उत्सुकताही नागरिकांमध्ये पाहायला मिळाली.

See also  “वाचाल तर वाचाल” संदेशाचा जागर- पुणे मनपामध्ये डॉ.आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप