पुणे, प्रतिनिधी : जागतिक योग दिनानिमित्त औंध परिसरात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. द औंध सोशल फाऊंडेशन आणि पतंजली परिवार, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम २१ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता डी.पी. रोड, औंध येथील सीझन बिझनेस स्क्वेअरसमोर असलेल्या द औंध सोशल फाऊंडेशन कार्यालय परिसरात होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका भक्ति अजित गायकवाड आणि द औंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित सुभाषदादा गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. तर आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
योग शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य असून ९ जून ते १५ जून या कालावधीत नोंदणी करण्यात आली होती. सहभागी प्रत्येक योगसाधकाला टी-शर्ट आणि ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पावसाची शक्यता असल्यास संगीतबद्ध योग कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तसेच सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजकांनी सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे योगा मॅट किंवा सतरंजी तसेच पाण्याची बाटली सोबत आणावी, असे आवाहन केले आहे.कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आणि संपर्कासाठी ९१६८६९९९०९ व ९१६८३९९९०९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले.















