मुख्यमंत्र्यांच्या ‘अराजकतावादी’ टीकेवर अभिजीत दिपके यांचे प्रत्युत्तर; “जय भीमच्या घोषणा देणे अराजक कसे?”

पुणे : छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री केलेल्या ‘अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले’ या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी, “मी जय भीमच्या घोषणा देतो, आंबेडकरांचे विचार मांडतो, मग ते अराजक कसे ठरू शकते?” असा सवाल उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा विचार करावा, असे सांगत दिपके म्हणाले, “ते उत्तर प्रदेशचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विचारांना मानणारा राज्य आहे. जे आंबेडकरांचे पुस्तक हातात घेऊन चालतात आणि जय भीमच्या घोषणा देतात, त्यांना अराजकतावादी म्हणणे दुर्दैवी आहे.”यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवरही सरकारवर टीका केली. दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवरही सरकारवर टीका केली. दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.देशातील तरुण आता सरकारला घाबरत नसल्याचा दावा करत दिपके यांनी युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

देशातील तरुण आता सरकारला घाबरत नसल्याचा दावा करत दिपके यांनी युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

See also  कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन