आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या आणि MISA (मीसा) अंतर्गत कारावास भोगलेल्या लोकशाही सेनानींचा भाजपाच्या वतीने सन्मान

पुणे : भारतीय जनता पार्टी, उत्तर कोथरूड मंडलाच्या वतीने आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि MISA (मीसा) अंतर्गत कारावास भोगलेल्या लोकशाही सेनानींचा सन्मान समारंभ कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाषाण येथील कार्यालयात संपन्न झाला.

या प्रसंगी मा. श्री. प्रकाश बालवडकर, मंडल अध्यक्ष श्री. सचिन पाषाणकर, नगरसेविका मयुरी कोकाटे, नगरसेविका रोहिणी चिमटे, सरचिटणीस श्री. मोरेश्वर बालवडकर, निकिता माताडे, अनिकेत चांदेरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जेष्ठ नागरीक आघाडीचे अध्यक्ष रघुनाथ उत्पात, गिरीशजी चोक, डांगरेकाका यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी लोकशाही सेनानी सौ. रंजनाताई धनंजय शितोळे, श्री. विश्वनाथ व्यंकटराव देशमुख, श्री. अविनाश सिताराम मोहरिल, श्री. अभय दिवाकर देशपांडे, श्री. नमनप्पा इरप्पा हिंगमिरे, श्री. सतीश वसंत क्षिरे, श्री. रत्नाकर लक्ष्मण मानकर, श्री. रामचंद्र किसन गायकवाड आणि सौ. रोहिणी दोडके यांचा सन्मान करण्यात आला.

आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या ज्येष्ठ सेनानींचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही. त्यांचा त्याग, धैर्य, राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाहीप्रती असलेली अढळ बांधिलकी ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

See also  बाणेर औंध हद्दीवरील तेजस्विनी सहकारी गृहरचना संस्थेवर उपनिबंधक कार्यालयाकडून प्रशासकाची नियुक्ती