प्रशांत पाटील यांचा शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मान : शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगीरीबददल खान्देश मराठा पाटील समाज संघातर्फे पुरस्काराचे वितरण

आकुर्डी : खान्देशातील धुळे सारख्या ग्रामीण आदीवासीबहुल भागात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगीरी केल्याबददल प्रशांत पाटील यांना खान्देश मराठा पाटील समाज संघातर्फे “शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. आकुर्डी येथे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, खान्देश फेम विनोद कुमावत, राणी कुमावत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पुणे महानगरपालिका उपायुक्त प्रतिभा पाटील होत्या. तसेच माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मा.नगरसेवक राहूल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, उद्योजक दीपक पाटील, मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव शंकर पाटील, मंडळाचे कार्यध्यक्ष उद्योजक शरद पाटील, सहकार्याध्यक्ष पंकज निकम, संचालक मोतीलाल भामरे, प्रदीप शिरसाठ, देविदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी, हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलांना आयएएस अधिकारी बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरविल्याबददल प्रभाकर(अण्णा) काशीनाथ पाटील व सौ. इंदुबाई पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, आमदार मंगेश चव्हाण यांना “समाजभूषण पुरस्कार” देवून यावेळी सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी, विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणा-या १३ मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये राहुल देसाई – उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार, डॉ. शीतलकुमार रवंदळे – शिक्षण रत्न पुरस्कार, ऍड. भुषण पाटील – सामाजिक न्याय भूषण पुरस्कार, प्रशांत पाटील – शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, हिरामण भांमरे – अर्थ भूषण पुरस्कार, हेमंत पाटील – उद्योजक पुरस्कार, मनोज पाटील – उद्योगरत्न पुरस्कार, भारती बोरसे – सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, गुलाब पाटील – उद्योगरत्न पुरस्कार, देवीदास पाटील – सामाजिक कार्यगौरव पुरस्कार, मनोज पाटील – युवा उद्योजक पुरस्कार, जितेंद्र पाटील- उद्योगरत्न पुरस्कार, कु. रोहिणी पाटील हिला उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच, कार्यक्रमावेळी लकी ड्रॉ द्वारे कुपन विजेत्या महिलांचा पैठणी देवून सत्कार करण्यात आला.

See also  बालभारती हा जीवनातील पहिला हस्तस्पर्श-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

त्यानंतर, “कर मन लगन” या खान्देशी गाण्याचा फेम विनोद कुमावत आणि “हाई झुमका वाली पोर” गाण्याची फेम राणी कुमावत तसेच, मिमीक्री स्टार विलास सिरसाठ यांनी विविध अहिराणी गीतांवर नृत्य सादरीकरणाने उपस्थित सर्वांची मने जिंकली. प्रास्ताविक अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केले. सुत्रसंचालन भरत बारी तर आभार शंकर पाटील यांनी मानले.