बाणेर : बाणेर येथे नवचैतन्य हास्ययोग परिवार पाषाण व आनंदवन ग्रुप मुरकुटे गार्डन यांच्या वतीने “डॉक्टर्स डे” साजरा करण्यात आला. या मध्ये जेष्ठ प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. संदिप कदम प्रमुख मेडिनेक्स्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वीरभद्रनगर बाणेर यांचा सत्कार श्री हरिष पाठक, अध्यक्ष नवचैतन्य हास्य क्लब पाषाण व श्री अजय कदम अध्यक्ष आनंदवन ग्रुप मुरकुटे गार्डन बाणेर यांच्या हस्ते मानपत्र व शाल देऊन जाहिर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. संदिप कदम यांनी मेडिनेक्स्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाणेर विषयी सविस्तर माहिती दिली हे ४५ बेडचे अत्याधुनिक हॉस्पीटल असून या मध्ये कॅथलॅब आहे. तेथे ऑजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली जाते तसेच डोळ्यांची शस्त्रक्रिया, मणके, मेंदू, गुडघे, प्रोस्टेट ग्लंड चे ऑपरेशन केले जाते. तेथे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आहे, त्यांनी रुग्णासाठी बरेच मोफत कॅम्प घेतले आहेत. डॉ. संदिप कदम यांच्याविषयी श्री पाठक, श्री. अजय कदम, श्री सुखदेव पवार, विद्या गोरंटीवार, प्रतिभा चव्हाण, श्री प्रवीण देशमुख व डॉ जनार्दन कदम यांनी अनुभव सांगितले. “रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा” माननाऱ्या आणि रुग्णाची काळजी घेणाऱ्या व रुग्णासाठी अहोरात्र झटणारे. डॉ संदीप कदम यांना “राष्ट्रीय डॉक्टर्स” दिनाच्या सुमारे 200 व्यक्तींनी शुभेच्छा दिला.














