बाणेर मध्ये भाजपाच्या वतीने काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात निषेध आंदोलन

बाणेर :- बाणेर येथे कै.बाबुराव हाबाजी सायकर चौक, झुडिओ मॉल समोर येथे काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या काळ्या धना बाबत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे शहर यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

सदर वेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, गणेश कळमकर, अस्मिता करंदीकर, भाजप पक्षाच्या महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळेस आंदोलन करताना काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच खासदार धीरज साहू यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

अमोल बालवडकर यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की, काँग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहू यांच्या घरात 300 करोड रुपये कॅश स्वरूपात सापडले असून इतकी बेहिशोबी मालमत्ता त्यांच्याकडे आला कुठून याचे काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण द्यावे. आज आम्ही येथे जमलो आहोत काँग्रेस पक्षाचा निषेध व्यक्त करत आहोत.

See also  बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे