विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

पुणे, दि. २२ : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या  लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यातील राजभवनाच्या प्रवेशद्वारासमोर काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा आरोप करत या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांवरही पोलीस बळाचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला.

पुणे हे विद्यार्थी चळवळींचे केंद्र राहिले असून विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत संघर्ष करत राहील, असा निर्धार आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात पुणे (पश्चिम) शहर काँग्रेसच्या अध्यक्षा दीप्तीताई चौधरी, अविनाश साळवे, रफिक शेख, अविनाश बागवे, मेहबूब नदाफ, मोहसीन शेख, लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

See also  हरित पुणे, समृद्ध पुणे मोहिमेचा शुभारंभ; ५ रुपयांत स्थानिक वृक्षांची रोपे उपलब्ध