मुठा नदीला दुसऱ्यांदा पूर पुण्यात विक्रमी पाऊस

पुणे : शहर आणि परिसरात पडलेल्या संततधार पावसामुळे मुठा नदीला या वर्षातला दुसरा पूर आज (शुक्रवारी) आला. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात जुलै महिन्यात ११९ वर्षांनंतर विक्रमी पाऊस पडला. जुलै महिन्यात ५१० मिलीमीटर पाऊस पडला आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात जून महिन्यात मुठा नदीला पूर आला, तेव्हा २२हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आज दुपारी तीन वाजता खडकवासला धरणातून ३५हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. पावसाचा जोर पाहता रात्री आठ वाजता ४०हजार क्यूसेक्स पाणी सोडावे लागेल, असे जलसंपदा खात्याने महापालिकेला कळविले आहे.

या पुरामुळे मुठा नदी पात्रातील वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे नदीलगतच्या छोट्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. जनजीवन विस्कळित झाले. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता.

पुढील सहा तास पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचा जोर कायम राहील. तरी महामार्ग, घाट येथून जाणाऱ्या मार्गावरचा प्रवास टाळावा. नदीकाठी रहाणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

See also  पाण्याची गळती रोखून पुणे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध करून देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस