पिंपरी: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंड येथील प्रचार सभेच्या ठिकाणी होम हवन करून शुद्धीकरण करण्याच्या प्रकाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज पिंपरी चौकात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
दि. 8 ऑगस्ट रोजी उत्तराखंड येथे हलदीप या शहरामध्ये काँग्रेस पक्षाची विजय शंखनाद रॅली संपन्न झाली रामलीला मैदानात संपन्न झालेल्या या रॅलीला मलिकार्जुन खर्गे यांनी संबोधित केले त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी श्रीराम सेना धर्मार्थ सेवा संघटनेच्या वतीने रामलीला मैदान परिसरात होम हवन आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले या प्रकाराचा निषेध करत दि. 13 ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेमध्ये आवाज उठवला यावर केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, चौकशी केली जाईल असे सांगितले आहे.
या प्रकाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड काँग्रेस आणि पुरोगामी सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरी चौकात तीव्र निदर्शने आंदोलन करत असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “कोण्या व्यक्तीच्या वावराने कोणता परिसर दूषित होत नाही, मात्र जातीयवाद, विषमता,भेदभाव अशा विचारांनी मेंदूची, मानसिकतेची अशुद्धी झालेली असते ती मात्र अशा प्रवृत्तींना संपवूनच शुध्द करता येते, ज्या पद्धतीने आज देशात राजवट सुरू आहे या संपूर्ण देशातील सत्तेचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे, येणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून, संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून देशातील जनता जातीयवादी, मनुवादी विचारांना हाकलवून भारत देशाचे शुद्धीकरण करेल” असे बनसोडे म्हणाले.
ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे नेते, मानव कांबळे म्हणाले, “मल्लिकार्जुन खरगेंसारख्या मोठ्या दिग्गज आणि लोकसभेत सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या नेत्याची अशा पद्धतीने प्रताडणा करणं योग्य नाही, भाजपच्या आरएसएसच्या विचारांच्या असणाऱ्या संघटनांकडून असा प्रकार देशात वारंवार होत आहेत, दलितांवर अत्याचार अन्याय करण्याचा त्यांचा वैचारिक वारसा आहे,अशा या खोट्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा नाश केल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, समाजसेवक मानव कांबळे, प्रदेश काँग्रेसचे नेते गौतम आरकडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते बी.बी. शिंदे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, ओबीसी महासंघाचे प्रतापराव गुरव, प्रदेश विचार विभागाचे युवक अध्यक्ष राहुल शिंपले, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, सेवा दलाचे ज्येष्ठ नेते अशोक मंगल, सेवा दलाचे कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, हरीश शिंदे, प्रदीप पवार, तारीख रिजवी, विल्यम साळवी, हरेश डोळस, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, सिद्धार्थ वानखेडे, देवदत्त रानवडे, संदीप शिंदे, युवराज पवार, डेनिस देवनसन, नबीलाल मुल्ला, सुरज माने, राजू परदेशी, मेहबूब शेख, शाहू गायकवाड, बाबा गायसमुद्रे, अशोक गायकवाड, गौरी नरसिंगे, कृष्णा जाधव, रवींद्र दुधेकर, अनिल सूर्यवंशी, रिजवान शेख, कुणाल भोसले, अलोक लाड, मंगेश चव्हाण, उमेश बनसोडे आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
















