मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; कात्रज चौकात मराठा समाजाचा रास्ता रोको

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धायरी परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याने काही काळ कात्रज चौकातील वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

See also  बालेवाडी परिसरामध्ये रात्रीच्या अंधारात विनापरवाना रस्ता खोदकाम करून बुडवला जातोय पालिकेचा कोट्यावधीचा महसूल