आठवणीतला पाऊस आणि मी – शिक्षक

गेल्या दोन दिवसात आभाळ फाटलं होतं. वाऱ्याान थैमान घातलं होतं. नद्यांचं पात्र वाढलं होतं. वातावरणातला पालापाचोळा कुठल्या कुठे उडून गेला होता. घरांची कौलं आणि पत्रे यांचे रूपडेही बदलले होते. सारं काही धुवून गेलं होतं. समुद्राच्या लाटा सुरूरून जणू नांवायला येतील असं वाटत होतं. आडांच्या फांद्या वाऱ्याच्या दिशेने एकसारख्या हालत होत्या. कुठल्या झाडाची जमिनीशी जुळलेली नाळ कधी तुटेल हे सांगता येत नव्हतं. गवताची पाती मात्र हसत होती. धरणातलं पाणी वाढत होतं. शेतात रोपं लागत होती. ढगांच्या आडून सूर्य हे सारं पाहत होता.

पावसानं शाळेला सुट्टी दिली. आता निसर्ग मुलांचा गुरु झाला होता. कागदाच्या होड्या पाण्यात उतरल्या. मखमली पावलं चिखलात उमटली. छत्र्यांच्या तारा तुटून गेल्या. कपाटातले रेनकोट बाहेर आले. पावसाच्या धारा खेळायला आल्या. चिंब चिंब भिजवून दिल्या. आनंदाच्या वाटा शोधायच्या कशा, अगदी सहज सांगून गेल्या. घरातली माणसं मात्र काळजीत होती. त्यती चार पावसाळे जास्तीचे पाहिले होते. पाण्याची अनेक रूप अनुभवली होती. त्यांचा गुरु ‘अनुभव’ होता. शाळा नसल्यामुळे मुलांवर लक्ष ठेवणे, हे ज्यादाचे काम आता त्यांना करावे लागले होते. पण मुलांना शाळेची आठवण येत होती. पाऊस नकोसा वाटत होता. शाळेतली मज्जा त्यांना खुणावत होती. पण पावसाने शाळेची वाट अडवनी होती. घरातल्या माणसांना हे मारं कळत होतं. मुलांचं मन त्यांना समजत होतं. शाळा दुरूनच दिसत होती. पण घंटेचा नाद नव्हता. प्रार्थनेचा सुर नव्हता. शिक्षकांचा सहवास नव्हता. आजूबाजूला पावसाचा गारवा होता. मुलांच्या मनात मात्र शाळेच्या सुखाची उब होती. पावसाचा आनंद आणि शाळेचा दुरावा हा वेगळाच दोलक मुले अनुभवत होती.

दोन दिवस गेले. आता वाऱ्याने दिशा बदलली. पाण्याचा खळखळाट थोडा मंदावला. रस्त्यावरचे पाणी नाल्यातून वाहू लागले. रस्ते चालायला मोकळे झाले. आकाशातील ढगांची गर्दी कमी झाली. धो-धो कोसळणाऱ्या जलधारा आता रिमझिम नृत्य करू लागल्या.

See also  रावसाहेब दानवे भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नियुक्त झाल्यामुळे पुण्यातील निकटवर्ती माजी नगरसेवकांना विधानसभेची संधी मिळणार का?

तिसरा दिवस उजाडला. मुलांची लगबग सुरू झाली. पाटी पुस्तकं आवरली गेली. मुलांची तयारी करून पालक मंडळी शाळेकडे निघू लागली. दोन दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या मनात उत्साह पेरला होता आणि मुलांच्या मनात शाळेची ओढ !

एक आजी आपल्या नातवंडांना घेऊन शाळेत ओली होती. पावसाने तिच्याही बेहत्यावर मुख पेरले होते. शाळेच्या मैदानावर पाऊल ठेवताच नातवंडांनी आजीचा हात सोडला आणि माळरानावर मुक्तपणे उधळणाऱ्या हरणासारखी ती मुलं त्यांच्या वर्गाकडे गेली. मुलांचे ते आनंदाने बागडणे आजी डोळ्यात साठवत होती. तिच्या डोळ्यांनी मागच्या दोन दिवस मुलांची शाळे शिवाय होणारी घालमेल पाहिली होती.

एवढ्यात बाई शाळेत आल्या. बाईकडे पाहत आजी म्हणाली, “दोन दिवस मुलं घरी कंटाळली.” बाईनी स्मित हास्य केलं आणि एक उदगार, “मुलं घरी कंटाळतात पण शाळेला कंटाळत नाहीत.” इतरांपेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेली आजी म्हणाली, “हो बाई, तुम्ही आई पेक्षा जास्त आमच्या मुलांची काळजी घेता, ऊन्हा पावसात त्यांना सांभाळता, ती शाळेत आली की आम्हाला कसलीच काळजी नसते”.

हळूहळू मुले शाळेत येऊ लागली. पालकांचा हात सोडून अवखळ वासरासारखी वर्गात कधी एकरूप व्हायची ते पालकांनाही कळायचं नाही. जाताना पालकांच्या डोळ्यात आश्वस्त भाव असायचे. ‘मुलं शाळेत नाहीत तर त्यांच्या आईकडेच आहेत. ही अव्यक्त भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायची.शाळेची घंटा वाजली. आता रिमझिम थांबली होती. त्या चार भिंतीतून प्रार्थनेचे सूर ऐकू येऊ लागले…. ढगाआडून सूर्य हे सारं पाहत होता. मुलांसाठी आई हवी की शाळा याचा विचार सूर्य करू लागला.

त्या दिवशी बाई शाळेत आल्या नाहीत. घरचा अभ्यास मुलांनी केला नाही. दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत गेली. पालक मुलांना शाळेत सोडून त्यांच्या कामाला गेले. शाळा सुरू व्हायला अजून वेळ होता. मुलं मैदानावर खेळत होती. मुलं आतुरतेने बाईंची वाट बघत होती. शाळेची वेळ झाली. तरी मुलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या बाई नव्हत्या. दिवसभर रानातून फिरून आल्यानंतर गोठ्यात आपले वासरू दिसले नाही तर गाईच्या डोळ्यात आणि आवाजात जी अस्वस्थता दिसते त्याच अवस्थेत मुलं दिसत होती. शाळेची घंटा वाजली. इतर शिक्षक शाळेत आले. परिपाठ सुरू झाला. हळूहळू मुले शाळेत रमून गेली. दिवसभर त्या मुलांच्या बाई शाळेत आल्याच नाहीत. आपल्या बाई आज आल्या नाहीत याची रुखरुख मुलांच्या मनात मात्र होती.

See also  भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात ओरेकल अपेक्स प्रमाणपत्र आणि कौशल्य विकासावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद

संध्याकाळ झाली. मुलं घरी गेली. आज पण मुलं अभ्यास करत नव्हती. इकडे बाईचा फोन एकसारखा बाजू लागला. पाच-सहा पालकांनी फोन करून विचारले, “बाई, आज शाळेत का नाही आलात तुम्ही?” “मला बरं वाटत नाही, म्हणून मी शाळेत येऊ शकले नाही”, थकलेल्या आवाजात बाई एवढेच बोलल्या. यावर प्रत्येक पालकाची एकच प्रतिक्रिया होती, “बाई, गोळ्या औषधं वेळेवर घ्या, लवकर वरं व्हा आणि लवकर शाळेत या, तुमच्याशिवाय आमची मुलं कशी राहतील”. पालकांचे प्रेम आणि विश्वास हे बाईंना मिळालेले खरे औषध. बाईंचा आजार कुठल्या कुठे पळून गेला. जगातला कोणताच डॉक्टर हे विश्वासाचे औषध देऊ शकत नाही. ते मिळते फक्त शिक्षकालाच.

‘आई पेक्षा जास्त माया लावता’ असे म्हणणारी आजी आणि ‘लवकर बरे व्हा, आमच्या मुलांचं कसं होणार’ असे म्हणणारे पालक. हे प्रेम फक्त शिक्षकालाच मिळते. या प्रेमाला ना पाऊस थांबवू शकतो ना आजार, अखंड विश्वाला प्रकाश देणा‌रा सूर्य हे सारं पहात होता. जसं तो स्वयंप्रकाशित तारा म्हणू लागला, “मी शिक्षक असायला हवा होतो”.

सौ. अपराजिता अ. कवितके.(शिक्षक), म.न.पा. शा. क्र .५४ बी (इंग्रजी) औंध, पुणे.