येत्या हिवाळी अधिवेशनात प्राध्यापकांच्या रखडलेल्या भरतीविषयी आवाज उठवू :आमदार रोहित पवार

पुणे : सेट-नेट, पीएच.डी. पात्रताधारक प्राध्यापक संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांच्या रखडलेली 100 टक्के भरती विषयी मागणीचे निवेदन आमदार रोहित पवार यांना देण्यात आले. सेट-नेट, पीएच.डी. पात्रताधारकांच्या मागण्या रास्त आहेत, याविषयी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित पवार यांनी दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. भास्करराव घोडके यांनी सांगितले.

सेट-नेट, पीएच.डी. पात्रताधारक प्राध्यापक संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आमदार रोहित पवार यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष प्रा.भास्करराव घोडके, खजिनदार डॉ. बाळासाहेब सोनवणे, संघटनेचे पदाधिकारी किरण मांजरे ,डॉ.गोरक्षा डेरे,डॉ.नरेशकुमार शिशुपाल ,डॉ.संतोष रोडे,प्रा.डॉ.राजकुमार गांधले, प्रा.धीरज शाखापुरे, प्रा.सुरज बैसाने, प्रा.सचिन म्हसवडे आदी उपस्थित होते.


प्रा.भास्करराव घोडके म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकपदाची भरती रखडली रखडलेली आहे.प्राध्यापकांच्या 2088 जागा भरण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून चालू आहे परंतु ती अद्याप पूर्ण झालेली नाही.महाराष्ट्रामध्ये 16000 हुन अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत आणि दिवसागणिक त्यामध्ये भर पडत आहे .नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यापूर्वी शासनाने ज्यांच्या आधारावर हे धोरण राबवले जाणार आहे. त्या घटकांकडे दुर्लक्ष करून धोरण राबवणे अशक्य आहे . तसेच सदया तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती 11 महिन्यांसाठी करण्यात यावी.तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना 50 हजार रुपये वेतन अदा करण्यात यावे व जोपर्यंत 100 टक्के प्राध्यापक भरती होत नाही तोपर्यंत तासिका तत्त्वावरील लोकांना 50000 रुपये वेतन अदा करून 11 महिन्यांसाठी त्यांना त्यांच्या नियुक्तीपत्र द्यावेत आणि ज्या सेट नेट पीचडी पात्राताधारकांच्या हाताला काम नाही आशानां प्रती महिना 25000 रुपये बेकार भत्ता शासनाने द्यावा यासह इतरही काही मागण्या या निवेदनामध्ये आमदार रोहित दादा पवार यांना देण्यात आल्या.
प्राध्यापकांच्या मागण्यांविषयी हिवाळी अधिवेशनामध्ये न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

See also  बियाणे, खते खरेदी करताना अशी घ्यावयाची काळजी