बाणेर औंध क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत गणेशमूर्ती विसर्जन घाट व संकलन केंद्रांची पाहणी

औंध : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी, तसेच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देता याव्यात, यासाठी आज पुणे शहरातील विविध विसर्जन घाट व गणेशमूर्ती संकलन केंद्रांची पाहणी करण्यात आली.

पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त गोविंद दांगट, स्थायी समिती सदस्य नगरसेविका मयुरी कोकाटे, प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका रोहिणी चिमटे, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, तसेच दीपक लांडे, हितेश आडे, सुरेंद्र जावळे, सौ. पाटील, सौ. जगदाळे यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व सेवक उपस्थित होते.

यावेळी बोपोडी, औंध-बाणेर, सोमेश्वरवाडी आणि पाषाण परिसरातील गणेशमूर्ती विसर्जन घाटांची पाहणी करण्यात आली. घाटांवरील स्वच्छता, विद्युत व्यवस्था, विसर्जनासाठी हौदांची उपलब्धता तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला.

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने नागरिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असल्याने घाटांवर आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या. विसर्जनाची प्रक्रिया गर्दी न होता शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी योग्य नियोजन करण्यावरही यावेळी भर देण्यात आला.

विसर्जन घाट परिसरातील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि हौदांची उपलब्धता याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पाहणीदरम्यान देण्यात आल्या.

See also  बाबा…. तुमच्या लेकीने इतिहास घडवला! केवळ सांगलीकरांनाच नव्हे देशवासियांनाही अभिमान, टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोद्गार