कोथरूडमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा; जास्वंदीचे रोप देऊन गणेश मंडळाचे स्वागत

कोथरूड : कोथरूडमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिवशाही प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे येणाऱ्या सर्व पोलीस बांधवांचे आणि गणेश मंडळांचे स्वागत व जास्वंदीचे रोप देऊन सत्कार करण्यात आले. तसेच सर्व गणेश भक्तांसाठी पाणी सेवा करण्यात आली.

यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव, अथर्व गाढवे, निहाल शेख, रोहन गाढवे, तेजस गाढवे, हिमांशु इंगोले, सार्थक मोकाटे, सोहेल शेख, मयुर भालिया, अथर्व साळुंखे, पियुष घाटे, गोपाल गोलाडे, अभिषेक मुळीक, प्रथम परिट, राहुल गायकवाड, मोहीत डोमाले, लोकेश गोपाळे, विश्वास खवळे, विकास काटे, मोहन साठे, हरिश्चंद्र घाणेकर आदी उपस्थित होते.

See also  बाणेर येथिल श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र भूषण मृदंग वादक गुरुवर्य ह.भ.प. श्री पांडुरंग अप्पा दातार यांना आरोग्य विषयी समसेंसाठी आर्थिक मदत